दुसऱ्या कसोटी सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाने विजयासाठी फक्त 70 धावांचे माफक आव्हान भारतीय फलंदाजांसमोर ठेवले . ते आव्हान भारतीय फलंदाजांनी अवघ्या 2 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. या विजयासोबतच टीम इंडियाने 4 सामन्यांच्या मालिकेत आता 1-1 अशी बरोबरी केली आहे. ह्या सामान्यचा हंगामी कर्णधार अजिंक्य रहाणे याने शतकी कामगिरी केली आणि भारतीय गोलंदाजांनी भेदक मारा करून कांगारूंना जणू धूळीसच मिळवलं अशा रंजक सामान्यत टीम इंडियाला विजय मिळाला . दरम्यान पहिल्या कसोटी सामान्यत संधी न मिळालेल्या भारतीय अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजानेही या सामन्यातील कामगिरीद्वारे सर्वांची मनं जिंकली आहेत.

जडेजा हाच खरा विजयचा नायक
टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीदेखील रवींद्र जाडेजाचं कौतुक केलं आहे. शास्त्री एका पत्रकार परिषदेत म्हणाले की, “जाडेजा एक ‘जेनुइन ऑलराऊंडर’ आहे. या ऑस्ट्रेलिया दोऱ्यात जाडेजा जेव्हा-जेव्हा मैदानात उतरला आहे, तेव्हा त्याने कमाल केली आहे”. आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये जाडेजा सध्या तिसऱ्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात सुरुवातीला एकदिवसीय मालिकेत भारताचा 2-1 असा पराभव झाला होता. या मालिकेतील तिसरा एकदिवसीय सामना भारताने जिंकला होता. या सामन्याचा नायक जाडेजाच होता. या सामन्यात शेवटच्या षटकांमध्ये रवींद्र जाडेजाने हार्दिक पांड्यासह चांगली भागिदारी करत भारताला 300 धावांचा टप्पा ओलांडून दिला होता. त्याने 50 चेंडूत 66 धावांची खेळी केली होती.
टीम मधील योग्य बदल जडेजामुळेच
पहिल्या टी-20 सामन्यात जाडेजाने 23 चेंडूत 44 धावांची खेळी केली होती. त्याच्या याच खेळीच्या जोरावर भारताने तो सामना जिंकला. या सामन्यात जाडेजाला दुखापत झाली होती. त्यामुळे तो पुढील सामना खेळू शकला नाही. त्यानंतर थेट मेलबर्न कसोटीत त्याचं पुनरागमन झालं. जाडेजाच्या पुनरागमानंतर टीम इंडिया बदलल्याचं जाणवत होतं. कारण अॅडलेड कसोटीत अर्धा डझन कॅचेस (झेल) सोडणारी टीम इंडिया दुसऱ्या कसोटीत क्षेत्ररक्षण करत असताना वेगळीच दिसली. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात जाडेजाने एक अत्यंत अवघड कॅच पकडला होता. त्यामुळे मॅथ्यू वेडला पव्हेलियनमध्ये परतावे लागले होते. जाडेजाच्या या कॅचनंतर टीम इंडियाने जबरदस्त क्षेत्ररक्षण केलं.
गेल्या चार वर्षांपासून अष्टपैलू खेळाडू
जाडेजा 2016 पासून कसोटी क्रिकेटमधील यशस्वी अष्टपैलू खेळाडू आहे. जाडेजाने 46.29 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. तसेच जाडेजाची गोलंदाजी करताना 24.97 इतकी सरासरी राहिली आहे. ऑलराऊंडर खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर इंग्लंडचा बेन स्टोक्स तर तिसऱ्या क्रमांकावर बांगलादेशच्या शाकिब अल हसन आहे.