Saturday, June 3, 2023
Advertisement
HomeLifestyleFashionमंगळागौरीचे मस्त उखाणे

मंगळागौरीचे मस्त उखाणे

- Advertisement -

1.पतिव्रतेचा धर्म नम्रतेने वागते ———- रावाचं नाव घेऊन आशीर्वाद मागते

2.हिरव्या साडीला पिवळा काठ जरतारी —— रावांचे नाव घेते, शालू नेसून भरजरी

3. शिंपल्यात सापडले माणिक मोती —— रावांच्या जीवनात झाले मी सारथी

4.महादेवाला बेल,विष्णूला तूळ्स —— रावांचे नाव घ्यायला कसला हो आळस

5.सासरचे निराजंन माहेरची फुलवात —– रावांचे नाव घेण्यास करते सुरुवात

6. जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने —– रावांचे नाव घेते पत्नी या नात्याने

7. माहेर जणू गंगा, सासर जणू सागर त्यातच एकरुप —– रावांचे सूख निर्झर

8. मंगळ्सूत्रात राहे सासरची प्रीती —– रावांचे नाव घेऊन समाधान चित्ती

9. पित्याचे कर्तव्य संपले, कर्तव्याला माझ्या सुरूवात —– रावांचे सह्कार्य लाभो, माझ्या भावी जीवनात

10. गजाननाची क्रुपा, गुरुंचा आशीर्वाद —– रावांचे नाव घ्यायला आज करते सुरुवात

11.  सुर्यबिंबाचा कुंकुम तिलक, प्रुथ्वीच्या भाळी —– रावांचे नाव घेते —— च्यावेळी

12.  संसाराच्या देव्हा-यात उजळ्तो नंदादीप समाधानाचा —– रावांचे नाव घेऊन, मागते आशिर्वाद अखंड सौभाग्याचा

13. स्वर्गाच्या नंदनवनात सुवर्णाच्या केळी —– रावांचे नाव घेते, मंगळागौरीच्यावेळी

14.  रुप्याच्या वाटीत सोन्याचा चमचा —–रावांचे नाव घेते मिळो आशिर्वाद तूमचा

15. मानवी जीवनाचा आहे परमेश्वर शिल्पकार —– रावांच्या रुपाने झाला साक्षात्कार

16. हिमालय पर्वतावर शंकर-पार्वतीची जोडी —– रावांच्या जीवनात आहे मला गोडी

17.  सर्वाना नमस्कारासाठी जोडते हो हात —– रावांचे नाव घेते पण सोडा माझी वाट

18.  भरलेल्या पंगतीत रांगोळी काढली चित्रांची —- रावांच्या साथीला बसली पंगत मित्रांची

19.  जडवाचे मंगळसूत्र सोन्याने मढविले —– रावांच्या नावाकरीता एवढे का अडविले

20.  शंकराच्या पिंडीवर बेलाचे पान —- रावांचे नाव घेते राखुन सर्वांचा मान



21.  आत्मरुपी करंडा, देहरुपी झाकण —– रावांचे नाव घेऊन बांधते मी कंकण

22. चंदनाच्या झाडावर बसला मोर —– रावांच्या जीवावर मी आहे थोर

23.  चंद्राचा उदय, समुद्राला भरती —– रावांच्या शब्दांनी सारे श्रम हरती

24.  सूख समाधान तिथे लक्ष्मीचा वास —– रावांना देते मी जिलेबीचा घास

25.  पदस्पर्शाने लंवडते उंबरठ्यावरलं माप —– रावांची भाग्यलक्ष्मी म्हणुन ग्रुहप्रवेश करते आज

26.  घराला असावं अंगण, अंगणात डोलावी तूळस —– रावांच्या जीवनात चढवीन आंनदाचा कळस

27.  सूख दू:खाच्या धाग्यांनी जीवन वस्त्र विणले —– रावांच्या सहवासात भाग्य माझे हसले

28. अंलकारात अंलकार मंगळसूत्र मूख्य —– रावांचा आनंद हेच माझे सौख्य

29. साता जन्मीची पूण्याई फळाला आली आज —– रावांच्या हाताने ल्याले मंगळ्सुत्राचा साज

30.  पत्रिका जुळ्ल्य़ा योग आला जूळून —- राव पती मिळावे म्हणून नवस केला कुलदेवतेला स्मरुन

31.  संसार सागरात प्रीतीच्या लाटा —– रावांच्या सुखदु:खात उचलीन मी अर्धा वाटा

32. आईवडिलांच्या आशिर्वादाने आला भाग्याचा दिवस —– राव पति मिळावे म्हणुन कुलदेवतेला केला नवस

33.  सीतेची पतिभक्ती, सावित्रीचा निग्रह —– रावांचे नाव घेण्यास नको मला आग्रह

34. मोत्याची माळ, सोन्याचा साज —– रावांचे नाव घेते मंगळागौर आहे आज

35. मंगळागौरी माते नमन करते तुला —– रावांचे अखंड सौभाग्य लाभू दे मला

- Advertisement -
- Advertisement -

Stay Connected

16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe

Must Read

- Advertisement -spot_img

Related News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here