मस्त थंडी पडलीय आणि अशा थंडीत स्निग्ध पदार्थ खावेत असे आरोग्यशास्त्र सांगते. म्हणूनच आपल्या संस्कृतीत या महिन्यामध्ये तीळाचे पदार्थ खावेत असे सांगितले आहे.
त्यातच थंडीत मकरसंक्रांत सण येत असल्याने या लाडवाला भारी मागणी असते.
सगळ्यात जास्त कॅल्शियम तिळात असते तिळात ई-जीवनसत्त्व असते, यात जास्त फॅट्स असल्याने वजन वाढवण्याची इच्छा असणार्या व्यक्तींनी हे लाडू या दिवसांत आवर्जून खावेत.
तिळातील ऑलेथिक ऍसिड वाईट कॉलेस्टेरॉल कमी करून चांगले कॉलेस्टेरॉल वाढवते शरीराला बाधणारे घटक तीळ कमी करतो त्यामुळे या हिवाळ्यात बिनधास्त तिळाच्या लाडवांवर ताव माऱा
तिळाचे लाडू
साहित्य: तीळ-१/२ किलो ,गूळ-१/२ किलो, शेंगदाणे-१/२ वाटी ,डाळं-१/२ वाटी ,सुके खोबरे-१/२ वाटी
कृती – तीळ चांगले भाजून घ्यावेत.(तीळ खमंग भाजलेत की नाही हे ओळखण्यासाठी भाजलेले तीळ दातांखाली चावले की टचकन आवाज येतो.तीळ भाजल्यावर थोड़े फुगीर होतात आणि त्यांचा रंगही बदलतो.)
जर तीळ नीट भाजले नाहीत तर लाडवांला खमंगपणा येत नाही.

शेंगदाणे सुद्धा खमंग भाजून त्यांची साले काढून कुटून घ्यावेत.सुके खोबरे किसून घ्यावे.
दाणे,डाळं आणि खोबऱ्याचा किस भाजलेल्या तिळात मिक्स करावा..
एक भांड्यात गूळ घालून गरम करावा.गूळ पातळ होउन त्याला बुडबुडे यायला लागले की पाक तयार होतोय असे समजावे.
सतत ढवळत रहावे.गैस मध्यम ठेवावा. एका वाटीत थोड़े पाणी घेउन त्यात टाकून बघावा.
गुळाची गोळी बनवून पाण्यात टाकली आणि टचकन आवाज आला तर पाक नीट झाला असे समजावे.मग त्यात तिळाचे मिश्रण घालावे.ढवळून गैस बंद करावा.
२ मिनिटानी मिश्रण एक परातीत किंवा ताटात काढून घ्यावे.हाताला तूप लावावे आणि थोड़े थोड़े मिश्रण हातावर घेउन लाडू वळावेत.
गुळाची पोळी
साहित्य :- गुळ १/२ किलो, १०० ग्राम तिळ, २ चमचे चण्याचे पीठ भाजून, वेलची पावडर, दाण्याचा कुट, खसखस, खोबरे
कृती :-कुकरच्या डब्यात थोडेसे तूप लावून गुळ ठेवायचा. आणि कुकर मध्ये पाणी घालून जाळीवर डबे ठेवा. त्यावर झाकण ठेवा.

कुकरच्या तीन शिट्ट्या काढा. गुळ गार झाला की त्यात भाजलेला मसाला (साहित्यात सांगितलेला ) घाला. मग सगळे एकत्र मळून घ्यावे.
कणिक:-कणिक आणि थोडा मैदा घेऊन पोळीच्या पिठाप्रमाणे भिजवा.
२ छोट्या छोट्या लाट्या करून मध्ये गुळाची लाटी घाला व तांदळाचा पिठीवर लाटा व निर्लेपच्या तव्यावर भाजा व थोडे तूप लावून गरम गरम वाढा.