Warning: include(wp-admin/image.ico): failed to open stream: No such file or directory in /home1/ennews/public_html/wp-blog-header.php on line 8

Warning: include(wp-admin/image.ico): failed to open stream: No such file or directory in /home1/ennews/public_html/wp-blog-header.php on line 8

Warning: include(): Failed opening 'wp-admin/image.ico' for inclusion (include_path='.:/opt/cpanel/ea-php73/root/usr/share/pear') in /home1/ennews/public_html/wp-blog-header.php on line 8
बाप रे तुम्ही अंघोळीसाठी साबण वापरताय? | ENN
Monday, December 5, 2022
Home Lifestyle Education बाप रे तुम्ही अंघोळीसाठी साबण वापरताय?

बाप रे तुम्ही अंघोळीसाठी साबण वापरताय?

- Advertisement -

संपूर्ण आयुष्यामधली एक अविभाज्य गोष्ट म्हणजे अंघोळीचा साबण.

स्त्री, पुरुष ,तारुण्यामधील मुलं मुली एवढंच कशाला अगदी लहान जन्माला आलेल्या नवजात बाळं साठी सुद्धा विविध प्रकारचे साबण बाजारामध्ये उपलब्ध आहेत.

आपण आपल्या अंघोळीसाठी कोणतं साबण निवडतो ह्याचा कधी विचार केला आहे का?

आपण एखादं अमुक किंवा तमुक साबण निवडलं तर हेच का निवडलं ह्याच अगदी ठाम असं उत्तर आहे का आपल्याकडे?

कदाचित नाही, कारण आपण सर्वजण अंघोळीसाठी लागणारे साबण हे , टीव्ही वरील जाहिराती बघून निवडत असतो अगदी कोणताही विचार न करता.

आपल्या अवतीभवती असे अनेक लोक आहेत जे नवीन साबण आलं म्हणून try करतात आणि सतत साबण बदलत राहतात.

आपण वापरतो ते साबण एक तर आयुर्वेदिक किंवा रासायनिक साबण असतात. आता ह्या साबणामध्ये कोणते कोणते घटक असतात ह्याचा कधी विचार केला आहे का ?

नसेल केला तर आता करूया,

साबण हे मुख्यतः फॅटी ऍसिड , कॉस्टिक सोडा आणि पाणी पासून तयार केलं जात.

ह्या फॅटी ऍसिड चे नैसर्गिक स्रोत नारळाचे किंवा मोहरीचे तेल आणि पाम वृक्ष हे आहेत तर ह्याउलट हेच फॅटी ऍसिड जनावरांच्या चरबी पासून सुद्धा मिळू शकते ज्याला TALLOW म्हणतात.

हे आपल्यला कत्तलखान्यामध्ये मिळू शकते.

दोन्ही पर्याया पैकी सध्याच्या साबणांमध्ये जनावरांच्या चरबीपासून मिळणाऱ्या फॅटी ऍसिड चा उपयोग केला जातो कारण ते तुलनेने स्वस्त मिळतात.

त्याचा प्रकारे सोडियम लॉरील सल्फेट सुद्धा साबण तयार करताना वापरला जातो ह्यामुळे आपल्यला साबणाचा चांगला फेस तयार होतो.

हे झाले साबणांमधील घटकांबद्दल , आता एखादं साबण चांगलं कि वाईट हे कशावरून ठरवणार आपण?

तर हे ठरतं त्या मध्ये असलेले एकूण फॅटी ऍसिड च्या प्रमाणावर त्यालाच TFM म्हणजेच (एकूण फॅटी मटेरियल).

जर हे TFM चं प्रमाण जास्ती असेल तर साबणाची गुणवत्ता आणि दर्जा हा चांगला समजला जातो आणि हेच प्रमाण कमी असेल  तर निकृष्ठ दर्जा असलेली साबण असे समजले जाते.

आपल्या अंघोळीच्या साबणामध्ये ह्या TFM च प्रमाण साधारणपणे किती असावे हे पाहू:

  १. कार्बोलिक साबण: या साबणामध्ये टीएफएमची टक्केवारी 40% ते 50% पर्यंत असते आणि हे साबण सर्वात निकृष्ठ दर्जाचे साबण समजले जाते .

ह्या साबणामध्ये  काही प्रमाणात फिनाइलही असू शकते जे सामान्यत: फारशीवरील  किंवा प्राण्यांच्या शरीरावर जंतू मारण्यासाठी वापरला जाऊ शकतो.

युरोपियन देशांमध्ये ह्या प्रकारच्या साबणानं animal soap असे म्हटले जाते.

२. शौचालय साबण: गुणवत्तेवर आधारित हा दुसरा दर्जाचा साबण मानला जातो आणि सामान्यतः शौचालयाचा साबण म्हणून ओळखला जातो.

मलविसर्जनानंतर हात धुण्यासाठी ह्या साबणांचा वापर केला  जातो. यात ५०% ते ६०% टीएफएम असते.

कार्बोलिक साबणापेक्षा हा साबण त्वचेला कमी हानिकारक असतो.

३.बाथ साबण : गुणवत्तेवर आधारित सर्वोत्तम साबण समजला जातो आणि तो आंघोळीसाठी वापरला जातो.

या साबणात टीएफएमची मात्रा  ७६ % पेक्षा जास्त असते .

या साबणाच्या रसायनांद्वारे त्वचेला होणारी हानी कमी असते.

कोणतेही रासायनिक साबणामध्ये ,फोमिंगसाठी वापरल्या जाणारा रासायनिक घटक  सोडियम लॉरेल सल्फेटमुळे त्वचेचे पेशी कोरड्या पडतात आणि ह्या पेशी हळू हळू मृत होऊ लागतात.

तसेच ह्या प्रकारची साबण हि डोळ्यांसाठी सुद्धा  खूप हानिकारक असतात,

जर आंघोळ करताना चुकून साबण डोळ्यांमध्ये गेला तर या रसायनाचा परिणाम होऊन डोळ्यामध्ये तीव्र जळजळण्याचा अनुभव येतो , त्वचेवर खाज वैगेरे सुद्धा सुटते.

भारतामध्ये मिळणाऱ्या नैसर्गिक आणि बहू-गुणी असा घटकांचा वापर आपण आपल्या अंघोळीसाठी केला तर आपली त्वचा निरोगी राहू शकते.

जाहिरातींच्या आहारी जाऊन कोणतेही साबण अंघोळीसाठी वापरू नका.

तुम्हाला जे सहन होईल आणि योग्य असेल अशाच साबणाचा वापर करा.

- Advertisement -
- Advertisement -

Stay Connected

16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe

Must Read

- Advertisement -

Related News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here