बॉलिवूडची सर्वात लोकप्रिय आणि आघाडीची अभिनेत्री दीपिका पदुकोण हीच आज वाढदिवस आहे.
ती सध्या बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेंत्रींपैकी एक आहे.
तिने अतिशय कमी कालावधीत प्रेक्षकांची मनें जिंकलेली आहेत आणि बॉलिवूडमध्ये आपले स्थानही निर्माण केले आहे.
ती नेहमीच विविध कारणांनी लाइमलाइटमध्ये राहत असते. रणवीर सिंगसोबत तिने लग्न केल्यानंतर हे कपल जास्तच चर्चेत असते.
आज दीपिका आपला 35 वा वाढदिवस साजरा करत आहे.
दीपिकाने ‘ऐश्वर्या’ नावाच्या कन्नड चित्रपटातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली.

त्यानंतर 2007 मध्ये ओम शांती ओम या चित्रपटातून तिने किंग खान म्हणजेच आपला शाहरुख खान बरोबर बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
त्यानंतर मागील 14 वर्षांमध्ये ती आघाडीची अभिनेत्री झाली असून आतापर्यंत तिने चेन्नई एक्स्प्रेस, ओम शांती ओम, ये जवानी है दिवानी यासारख्या सुपरहिट चित्रपटात काम केले आहे.
त्याचबरोबर अनेक चित्रपटांमध्ये तिची गाणी देखील खूप लोकप्रिय झाली आहेत.