सध्या औरंगाबाद शहराच नामांतर करून संभाजीनगर करा हा मुद्दा प्रचंड तापला आहे.
त्यातच मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर अकाउंट वरून औरंगाबादचा संभाजीनगर असा उल्लेख करण्यात आला आहे ;CMO mention Aurangabad name as Sambhajinagar on twitter.
औरंगाबाद शहराचे संभाजीनगर असं नामकरण करा, अशी शिवसेनेची गेल्या कित्येक वर्षांपासूनची मागणी होती.
औरंगाबाद महापालिकेची निवडणूक आता तोंडावर आली असल्याने भाजप आणि मनसेकडून वारंवार शिवसेनेच्या याच मागणीवर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत .

राज्यात शिवसेना सत्तेत असून सुद्धा औरंगाबाद शहराचं नामकरण का होऊ शकले नाही?
असा सवाल करत भाजप आणि मनसेने शिवसेनेला घेरण्याचा अनेकदा प्रयत्न केला आहे.
तर काँग्रेसने संभाजीनगर नामकरणाला नेहमी विरोध दर्शवला आहे.
नामांतराच्या ह्या मुद्द्यावरुन सत्ताधारी पक्षांमध्येच एकमत नसल्याने विविध चर्चांना उधाणही आलेलं आहे.
या सर्व घडामोडी ताज्या असतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर अकाउंट वरून संभाजीनगर असा उल्लेख करण्यात आल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.