कश्मीरा शाह हे नाव बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीमधील आपल्या खूपच परिचयाचं नाव आहे. कश्मीरा बिग बॉस या शोमध्येही झळकली होती.
पण या शोमधून तिला लवकरच बाहेर पडावं लागलं होतं. ती नेहमीच तिच्या बोल्ड अंदाजामुळे चर्चेत असते .
तिचा नवरा आणि प्रसिद्ध अभिनेता कृष्णा अभिषेक ने स्वत: कश्मीराचे काही बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.
कश्मीरा शाह आणि कृष्णा यांच्या प्रेम कहाणी पप्पू पास हो गया या चित्रपटाच्या सेटवर खऱ्या अर्थाने सुरु झाली. शूटिंग संपल्यानंतरही ते दोघं एकमेकांसोबत वेळ घातलवत.
काही दिवसतच त्यांनी लिव्ह इनमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. आणि 2013 मध्ये त्यांनी लग्न केलं पण त्यांचं नातं जगजाहीर केलं नव्हतं. पण काही वर्षांनी त्यांनी स्वत: त्यांच्या नात्याबद्दल चाहत्यांना सांगितलं.
कश्मीरा शाह आणि कृष्णाने २०१३ मध्ये लग्न केलं त्यामध्ये कश्मीराचं हे दुसरं लग्न आहे. लग्नानंतर कश्मीराने आई होण्यासाठी खूप प्रयत्न केले होते .
पण प्रत्येक वेळी तिला काही ना काही कॉम्प्लिकेशन्स येतच होत्या. कश्मीराने 1- 2 वेळा नाही तर तब्बल 14 वेळा आई होण्यासाठी प्रयत्न केले होते असे तिने एका मुलाखती दरम्यान सांगितले .
पण त्यांना यश आलं नाही सरते शेवटी त्या दोघांनी सलमान खानने दिलेला सल्ला ऐकला आणि आता त्यांना 2 गोजिरवाणी मुलं आहेत.
कश्मीरा म्हणते, ‘शेवटी सलमान खानने आम्हाला सरोगसीचा सल्ला दिला. आणि आम्हालाही तो विचार पटला.
2017 मध्ये आम्हाला जुळी मुलं झाली. त्यांच्या येण्यामुळे आमच्या आयुष्यात आनंद आला. सलमानने आमच्यासाठी जे काही केलं आहे त्यासाठी आम्ही दोघं आयुष्यभर त्याचे ऋणी राहू’