Saturday, June 3, 2023
Advertisement
HomeMaharashtraशिवसेनेने काँग्रेस समोर नांगी टाकली

शिवसेनेने काँग्रेस समोर नांगी टाकली

- Advertisement -

मुख्यमंत्री कार्यालयाच्या ट्विटर अकाऊंटवर औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा केला गेल्यामुळं सत्ताधारी पक्षतील काँग्रेसनं तीव्र नाराजी दर्शवली.

त्यानंतर लागलीच ह्या मुद्द्यावर ठाकरे सरकारमधील काही मंत्र्यांनी संबंधितांना समज देऊ असा खुलासा केला आहे .

ह्यावरून भारतीय जनता पक्षाने शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

काँग्रेसनं डोळे वटारताच अधिकाऱ्यांना समज देण्याची भाषा करणारे नामांतर काय करणार, असा टोला भाजपनं शिवसेनेला लगावला आहे.

औरंगाबादचे ‘संभाजीनगर’ करण्याचा मुद्दा सध्या राज्यात दिवसेंदिवस वादाचा विषय ठरत आहे.

राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये यावरून जबरदस्त मतभेद होत आहेत. शिवसेना नामांतरासाठी नेहमीच आग्रही राहिली आहे.

त्यातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद विमानतळाचे नामांतर करण्याची आठवण देणारे पत्र नागरी उड्डाण मंत्र्यांना केलं आहे.

तर इकडे , काँग्रेसचा ह्या नामांतरालाही तीव्र विरोध आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी वेळोवेळी याविषयी भूमिका स्पष्ट केली आहे.

एवढं सगळं होऊनसुद्धा, काल राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयाची माहिती देताना मुख्यमंत्र्यांच्या ट्विटर अकाउंटवर औरंगाबादचा उल्लेख ‘संभाजीनगर’ असा करण्यात आला होता.

ह्या घटनेवर काँग्रेसनं तीव्र नाराजी व्यक्त केली आहे . ‘सरकारी कामकाज हा कायदेशीर दस्तऐवज असतो, याचे भान बाळगावे,’ असा संताप थोरात यांनी व्यक्त केला.

त्यानंतर काँग्रेसचेच एक मंत्री अस्लम शेख यांनी ह्या मुद्द्यावर वृत्तवाहिन्यांशी बोलताना खुलासा केला की ‘टाइप करताना कधीतरी चूक होत असते.

मुख्यमंत्री कार्यालयाचं ट्विटर हँडल करणाऱ्या व्यक्तीला समज देण्यात येईल,’ असेही त्यांनी सांगितले . त्यावरून महाराष्ट्र भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शिवसेनेला टोला लगावला.

‘काँग्रेसनं ठणकावलं की लगेच शिवसेनेनं साष्टांग दंडवत घातला.

साधं ट्विटरवर संभाजीनगर म्हणू शकत नाही? काँग्रेसनं डोळे वटारताच संभाजी नगरचा उल्लेख करणाऱ्याला समज देण्याची भाषां? हे नामांतर काय करणार?,’ हा सवाल उपाध्ये यांनी केला आहे.

- Advertisement -
- Advertisement -

Stay Connected

16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe

Must Read

- Advertisement -spot_img

Related News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here