अध्यक्षपदावरुन सध्या काँग्रेसमध्येच अंतर्गंत वाद चालू आहेत.
लोकसभा निवडणुकीनंतर राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला त्यानंतर मात्र सोनिया गांधीं ह्यांनी नेतृत्वाची जबाबदारी स्वीकारली होती.
त्यानंतर आता पुन्हा एकदा याविषय भरपूर चर्चा केल्या जात आहेत .
‘काँगेस नेते राहुल गांधी यांच्यावर अपशब्दात टीका करणं योग्य नाही ती आपली संस्कृती नाही.
स्वातंत्र्य काळात काँग्रेस पक्षाचं योगदान मोलाचं आहे.
त्यामुळं जनतेला जर काँग्रेसचं नेतृत्व गांधी कुटुंबानं करावं असं वाटत असेल तर तो पक्षाचा निर्णय आहे,’ अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.
‘काँग्रेस हा सर्वात जुना राजकीय पक्ष आहे. गावागावत पोहचलेला पक्ष आहे.

स्वातंत्र्य चळवळीत काँग्रेस पक्षाचं योगदान आहे. पंडित जवाहरलाल नेहरु, इंदिरा गांधी आणि इतरांनीही देशासाठी त्याग केला आहे.
त्या पक्षाचं अध्यक्षपद हे देशातील राजकारणातील एक महत्त्वाचं पद आहे.
अशा काँग्रेसच्या नियोजित अध्यक्षाला ते विरोधी पक्षाचे नेते आहेत म्हणून अपशब्द वापरणे ही आपली संस्कृती नाही, अशी टीका करत संजय राऊत यांनी केंद्रातील सत्त्ताधारी भाजपवर निशाणा साधला आहे .
त्याचप्रमाणे , सत्ताधारी पक्षांनी देशाचा इतिहास आधी तपासाला पाहिजे विरोधी पक्ष आज दुबळा वाटत असला तरी अचानक तो फिनिक्स पक्षाप्रमाणे झेप घेतो आणि ताकद दाखवतो,’ असे भाव त्यांनी व्यक्त केले आहेत.