टेस्ला आणि स्पेसएक्स अशा दोन बलाढय कंपन्यांचे संस्थापक एलोन मस्क यांनी अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांना मागे टाकलं असून मस्क आता जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत.
त्यांची संपत्ती जेफ बेझोस यांच्यापेक्षा १.५ अब्ज डॉलरने अधिक आहे.
टेस्लाच्या shares मध्ये वाढ झाल्यामुळे एलोन मस्क ह्यांचाही संपत्तीत वाढ झाली आहे असे सांगितले जात आहे.
एलोन मस्क यांची एकूण संपत्ती १८८. ५ अब्ज डॉलर म्हणजेच १,३८,४२,७८,९६,७५,००० रुपये एवढी आहे.
त्यामुळे सध्या एलोन जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती झालेले आहेत.
मागच्या वर्षी टेस्ला कंपनीच्या shares मध्ये ८ % नी वाढ झाली होती.
त्यावेळी पासून टेस्ला ही जगातील सर्वात महागडी कंपनी म्हणून ओळखली जाऊ लागली होती.
यावेळीसुद्धा shares च्या वाढीमुळे मस्क यांची संपत्ती वाढली होती.
ब्लूमबर्गने दिलेल्या माहिती नुसार एलोन मस्क यांची टेस्ला कंपनीमध्ये २०% हिस्सेदारी आहे.
या वर्षीच्या सुरुवातीलाच मस्क यांच्या टेस्ला कंपनीच्या shares मध्ये पुन्हा वाढ झालेली आहे.
ही वाढ तब्बल ७. ६ टक्क्यांनी होती.
गुरुवारी टेस्ला कंपनीच्या shares ची किंमत ८११.३१ डॉलर्स होती .
सूत्रांनुसार मागच्या वर्षी एलन मस्क यांच्या संपत्तीमध्ये १५० अब्ज डॉलर्सने वाढ झाली आहे.
तरीही , फोर्ब्स बिलिनियर्सच्या लिस्टनुसार एलोन मस्क यांची संपत्ती अजूनही जेफ बेझोस यांच्यापेक्षा ७. ८ अब्ज डॉलर्सने कमी असल्याचं म्हणले जात आहे .