करोनाच्या साथीला आला घालण्यासाठी अनेक देशांमध्ये लसीकरण सुरू आहे.
मात्र, ही लस खरंच परिणामकारक आहे की दुष्परिणाम कारक आहे हे तपासले पाहिजे.
कारण लसीचे खूप दुष्परिणाम समोर येत आहेत. लस घेतल्यानंतर एका डॉक्टरचा मृत्यू झाला आहे असा आरोप करण्यात येत आहे.
मियामीतील डॉक्टर ग्रेगरी मायकल (वय ५६ ) काही यांनी दिवसंपूर्वीच करोना लस घेतली आणि लस घेऊन १६ दिवसही होत नाहीत तोवरच त्यांचा मृ्त्यू झाल्याचा आरोप त्यांच्या पत्नीने केला आहे.
डॉक्टर ग्रेगरी मायकल यांनी फायजर कंपनी ची लस घेतली होती. त्यांची पत्नी हेइदी नेकेलमान यांनी सांगितले की, १८ डिसेंबर रोजी ग्रेगरी यांनी लस घेतली.
त्याआधी त्यांची प्रकृती अगदी उत्तम आणि ठणठणीत होती. एवढंच नव्हे तर त्यांना कोणताही आजार नव्हता.
लस घेतल्यानंतर ग्रेगरी यांच्या प्रकृतीत अचानक बिघाड झाल्याचे त्यांनी सांगितले.
डॉक्टर ग्रेगरी यांना रोगप्रतिकार क्षमतेशी निगडीत दुर्मिळ आजार झाल्याचे निष्पन्न झाले व रविवारी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.

करोनाच्या लसीमुळे हा आजार झाला असल्याचा आरोप ग्रेगरी यांच्या पत्नीने केला. हेईदी नेकेलमान यांनी ‘डेली मेल’ ला सांगितले की, डॉक्टर ग्रेगरी यांच्या मृत्यूचा थेट संबंध लसींसोबत आहे.
लस घेतल्यानंतरच त्यांना आजार झाला आणि त्यामुळेच त्यांचा मृत्यू झाला असल्याचे हेईदी यांनी म्हटले.
लसीमुळे डॉक्टर ग्रेगरी यांचा मृत्यू झाला असे आम्ही मानत नाही असे कंपनीने स्पष्ट केलेले आहे.
डॉक्टर ग्रेगरी यांच्या मृत्यूची कसून चौकशी सुरू असल्याचे फायजरने सांगितले आहे.
लस घेतल्यानंतर ग्रेगरी यांच्या प्रकृतीत कोणताही साइड इफेक्ट आढळून आला नाही.
तीन दिवसानंतर त्यांच्या शरीरावर लाल चट्टे पडले असल्याचे ग्रेगरी यांच्या लक्षात आले.
त्यानंतर त्यांनी स्वत: माउंट सिनोई मेडिकल सेंटरमध्ये तपासणी केली.
त्यावेळी त्यांच्या शरीरात प्लेटलेट्सची संख्या मोठ्या प्रमाणावर कमी झाली असल्याचे दिसून आले.
तसेच , मेक्सिको येथे फाइजर कंपनीच्या लसी बाबत एक गंभीर बाब समोर आली आहे.
एक महिला डॉक्टरला कोविड-१९ ची फाइजर व्हॅक्सीन घेतल्यानंतर लकवा मारला आहे.