अभिनेत्री प्रियांका चोप्रा मागील बऱ्याच दिवसांपासून लंडनमध्ये आहे.
कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर तेथे लागू करण्याच आलेल्या लॉकडाऊनच्या कचाट्यात ही देसी गर्ल अडकली आहे.
तिथेच आता, देसी गर्ल एका मोठ्या सलून मध्ये गेल्याचे दिसून येत आहे.
इथे ती तिच्या आईसोबत आली होती. मुख्य म्हणजे, प्रियांकानं सलूनमध्ये जाण्यासाठी लॉकडाऊनचे नियम मोडले.

ह्या प्रकारामुळे सोशल मीडियावर प्रियांकाला तिच्या या भलत्याच निर्णयामुळं अनेकांच्या रोषाला आणि बोचऱ्या टीकेला सामोरं जावं लागत आहे.