कोरोनाच्या लसीची आपण अगदी आतुरतेने वाट पाहत होतो त्यातच आता कोरोनाच्या लसीकरणासंदर्भात मोठी बातमी हाती आली आहे.
ती म्हणजे येत्या १६ जानेवारीपासून देशभरात कोरोना लसीकरण होणार आहे. केंद्र सरकारने यासंबंधी घोषणा केली आहे.
यामध्ये सगळ्यात आधी आरोग्य सेवकांना आणि अग्रभागी काम करणाऱ्या कामगारांना लस दिली जाईल असे सूचना आहे.
केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार, अंदाज 3 कोटी कामगारांना आधी लस दिली जाणार आहे.

त्यानंतर 50 वर्षांवरील आणि 50 वर्षांखालील लोकसंख्या असलेल्या सहकारी गटाला लस दिली जाईल.
यामध्ये तब्बल 27 कोटी नागरिकांचा समावेश असणार आहे अशी माहिती केंद्राकडून देण्यात आली आहे.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सीरमनं उत्पादीत केलेल्या कोव्हिशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्स या दोन लसींचं लसीकरण करण्यात येणार आहे.
केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारकडून कोरोना लसीकरणाची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.
१६ जानेवारीपासून कोरोनाची ही लस सर्वसामान्यांना दिली जाईल.
कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव झाल्यानंतर वर्षभराच्या आतच भारताना कोरोना प्रतिबंधक लस विकसित केली आहे.
कोरोनाची ही लस सर्वात आधी डॉक्टर, नर्स यासारखे आरोग्य कर्मचारी, सैनिक यासारख्या कोरोना योद्धांना दिली जाणार आहे.

यानंतरच्या टप्प्यात मात्र कोरोना लस ही 50 हून अधिक वय असलेल्या किंवा 50 हून कमी वय आजारी असलेल्या व्यक्तींना दिली जाईल.
संपूर्ण देशात येत्या दहा दिवसात कधीही कोरोना लसीकरणाचा कार्यक्रम सुरु होईल, अशीही माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
आम्ही कोरोना लसीकरणासाठी तयार आहोत. मात्र लसीकरणाची अंतिम तारीख सरकारकडून निश्चित करण्यात येईल.
डीसीजीआयने 2 आणि 3 जानेवारीला लसींच्या आपत्कालीन वापराला मंजुरी दिली होती.
त्यानंतर आता 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात होणार आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.