काल रात्री पाकिस्तान मध्ये अचानक अंधार झाला त्यामुळे गोंधळ झाल्याचं पाहायला मिळाले .
काल संपूर्ण पॉवर सिस्टम फेल झाल्यामुळे पाकिस्तानची “बत्ती गुल” झाल्याचं पाहायला मिळालं.
अद्यापही वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला नसून अनेक शहरांमध्ये वीज गायब आहे
संपूर्ण पाकिस्तानमध्ये पॉवर सिस्टम फेल झाल्यामुळे पाकिस्तानची बत्ती गुल झाली होती.
पाकिस्तानमधील कोणतंही असं शहर नाही किंवा चौक नाही, जिथे वीज असल्याचं पाहायला मिळालं नाही.

दरम्यान, वीज गेल्यानंतर बराच काळ लोटल्यानंतरही अनेक भागांत अद्याप वीज परत आलेली नाही.
संपूर्ण पाकिस्तानातच अचानक वीज गेल्याचे वृत्त वाऱ्यासारखं जगभरात पसरलं, त्यानंतर ट्विटरवर #blackout हा हॅशटॅग ट्रेंड सुरु झाल्याचे बघायला मिळालं.
कोणी या घटनेला भारतीय वायू सेनेने केलेला हल्ला म्हणत होतं तर कोणी याला सायबर अटॅक म्हणत होतं.
ह्या घटने दरम्यान पाकिस्तानी टीव्ही चॅनल्सवरही पॉवर ब्लॅकआउटचं वृत्त प्रसारित होऊ लागलं.
असं सांगण्यात येत आहे की, पाकिस्तानमधील सर्वच मोठ्या शहरांमध्ये म्हणजेच, कराची, इस्लामाबाद, लाहौर, पेशावर, रावलपिंडी याठिकाणीही पॉवर ब्लॅकआउट झालं आहे.
यासर्व गोंधळादरम्यान, पाकिस्तानच्या ऊर्जा मंत्र्यांनी ट्विटरवर एक ट्वीट केलं आहे.
पाकिस्तानी ऊर्जा मंत्र्यांनी ट्वीट करून सांगितले आहे की , “रात्री 11 वाजून 41 मिनिटांनी पॉवर ट्रान्समिशन सिस्टमची फ्रिक्वेंसी अचानक 50 ते 0 ने खाली आल्याचं पाहायला मिळालं.
त्यामुळे संपूर्ण देशात ब्लॅकआऊट झालं आहे. यामागील कारण शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे नागरिकांनी संयम राखावा.”