Friday, March 31, 2023
Advertisement
HomeLifestyleHealthकोविड-१९ लसीसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक?

कोविड-१९ लसीसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक?

- Advertisement -

कोविड-१९ लसीसाठी नोंदणी करायची असून त्यासाठी काही कागदपत्रांची आवश्यकता आहे ,आपल्याकडे ती आहेत ना?

गेल्या वर्षभरापासून आपण ज्या कोरोना लसीची प्रतीक्षेत होतो, ती संपली आहे. कारण आता १६ जानेवारी पासून कोरोना लसीकरणाला देशभरात सुरुवात होत आहे.

पहिल्या टप्प्यात जवळपास 3 कोटी नागरिकांचे लसीकरण होणार आहे.

यामध्ये आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांना सर्वात आधी कोरोनाची लस दिली जाणार आहे.

त्यानंतर देशातील 50 वर्षांहून अधिक वयाच्या आणि गंभार आजारानेग्रस्त असलेल्या नागरिकांना प्राधान्य दिलं जाणार आहे. कोरोना लसीकरणाची नोंदणी केली जाणार आहे.

कोरोना लसीसाठी नाव नोंदणीसाठी फोटोसाठी आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, डायव्हिंग लायसन्स, पॅनकार्ड, मनरेगा जॉब कार्ड, सेवा ओळखपत्र (फोटोसह) केंद्र/राज्य सरकारद्वारे जारी केलेले पासपोर्ट, आरजीआयने जारी केलेले स्मार्ट कार्ड, टपाल कार्यालय/बँकेने दिलेला पासबुक फोटो आणि कामगार मंत्रालयाच्या आरोग्य विमा स्मार्ट कार्डसह पेन्शन दस्तऐवज आवश्यक असेल.

यापैकी कोणतीही कागदपत्रे असल्यास आपण कोरोना लसीकरणासाठी नोंदणी करण्यास सक्षम असाल.

यासह 1075 वर टोल फ्री हेल्पलाईन क्रमांकही देण्यात आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 जानेवारी रोजी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत, परंतु त्याआधी लसीकरणाची तारीख जाहीर झाली आहे.

या व्यतिरिक्त, लोकांमध्ये लसीसंबंधीची भीती दूर करण्यासाठी सत्ताधारी भाजप मोठ्या प्रमाणात मोहीम राबवित आहे.

- Advertisement -
- Advertisement -

Stay Connected

16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe

Must Read

- Advertisement -spot_img

Related News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here