आपण टोमॅटो ,अंडा ,बेसन ह्याचे ऑम्लेट खाल्ले असतील.
आज आपण अगदी नवीन प्रकारचे आणि खमंग बटाटा ऑम्लेट कसे बनवायचे ते पाहू.
हे बटाटयाचे ऑम्लेट लहान मुलांना आणि मोठ्यानं सुद्धा खूप आवडतील.
साहित्य –
२-३ बटाटे, ३-४ कांदे, ३-४ हिरव्या मिरच्या, १ टोमॅटो, १ वाटी डाळीचे पीठ, अंदाजाने धनेपूड, जिरेपूड, मिरपूड, मीठ, २-३ चमचे लोणी.

कृती –
बटाटे उकडवून कुस्करून घ्यावेत. मिरची, कांदा, टोमॅटो बारीक चिरावे.
मग कुस्करलेला बटाटा, मिरची, कांदा, कोथिंबीर, टोमॅटो, डाळीचे पीठ एकत्र करून घ्यावे.
त्यात अंदाजाने मिरपूड, धने-जिरे पूड व मीठ घालावे.
पाणी घालून ते सैलसर करावे.
मग फ्रायपॅनमध्ये थोडे लोणी सोडून या पिठाचे आमलेट घालावे.
दोन्ही बाजूने लोणी सोडून भाजावे.
हिरव्या चटणीबरोबर खाण्यास घावे.
एकदा नक्कीच करून पहा आणि नवीन पदार्थाचा आस्वाद घ्या.