Friday, March 31, 2023
Advertisement
HomeIndiaमंदिरासाठी १००० कोटींचा निधी जमा

मंदिरासाठी १००० कोटींचा निधी जमा

- Advertisement -

अयोध्येत उभारण्यात येणाऱ्या राम मंदिरासाठी श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्यावतीनं देशभरात निधी मोहिम राबवण्यात आली आहे.

या मोहिमेच्या माध्यमातून सध्या सुमारे १००० कोटी रुपयांचा निधी ट्रस्टकडे जमा झाला आहे,

अशी माहिती ट्रस्टचे एक विश्वस्त आणि कर्नाटकातील उडुपी येथील पेजावर मठाचे मठाधिपती श्री विश्वप्रसन्न तीर्थ महाराज यांनी दिली.

Ram Mandir

राम मंदिराच्या उभारणीसाठी केंद्र सरकारने श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टची स्थापना केली आहे.

विश्व हिंदू परिषदेच्या सहकार्याने या ट्रस्टचे काम चालते. १५ जानेवारीपासून या ट्रस्टने देशभरात देणगी मोहिमेला प्रारंभ केला.

याद्वारे आत्तापर्यंतच केवळ दीड महिन्यातचं ट्रस्टकडे १००० कोटी रुपयांचा निधी जमा झाला आहे.

विश्वस्त विश्वप्रसन्न महाराज म्हणाले, “दक्षिण भारतातील जनतेनं या मोहिमेला देलेल्या प्रतिसादामुळे मी खूपच आनंदी आहे.

निधी गोळा करायच्या कामासाठी मी मोठा प्रवास केला आहे. समाजातील सर्व स्तरातील लोकांनी या प्रकल्पासाठी मदत दिली आहे.

निधीमध्ये वाढ होणं ही मंदिर निर्माणासाठी काम करणाऱ्या संपूर्ण हिंदू समाजासाठी महत्वाची बाब आहे.

अयोध्येत मंदिर उभारायचं आणि त्यात प्रभू रामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करायची एवढाच ट्रस्टचा उद्देश नाही.

तर पुढे जात रामराज्य म्हणजे आदर्श कल्याणकारी राज्य प्रस्थापित करण्याचं या प्रकल्पाचं अंतिम उद्दीष्ट आहे.”

- Advertisement -
- Advertisement -

Stay Connected

16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe

Must Read

- Advertisement -spot_img

Related News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here