भाजप येत्या 23 तारखेपर्यंत आमदार, खासदारांना निवेदन देणार आहे.
त्यानंतर २४ फेब्रुवारीला राज्यातील 287 ठिकाणी जेलभरो आंदोलन होणार असल्याची घोषणाही बावनकुळेंनी केलीय.
राज्य सरकारने दमदाटी करुन, पोलीस बळाचा वापर करुन शेतकऱ्यांची वीज कापली.
फसवी कृषी संजिवनी योजना आणली.
शेतकऱ्यांकडे 50 टक्के वीज बिल भरायला पैसे नाहीत.

शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष असल्याचा दावा माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलाय.
कोणतंही डिस्कनेक्शन न करता शेतकऱ्यांना वीज देता येते, असंही बावनकुळेंनी म्हटलंय.
ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.
राज्य सरकारने अवकाळी आणि गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळालेली नाही.
आतापर्यंत फक्त 20 टक्के शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत मिळाल्याचा आरोप बावनकुळेंनी केलाय.
त्या पार्श्वभूमीवर भाजप येत्या 23 तारखेपर्यंत आमदार, खासदारांना निवेदन देणार आहे.
त्यानंतर 24 तारखेला राज्यातील 287 ठिकाणी जेलभरो आंदोलन होणार असल्याची घोषणाही बावनकुळेंनी केलीय.
त्यामुळे वाढीव वीज बिलाविरोधात भाजपनं महावितरणच्या कार्यालयांना टाळे ठोको आंदोलन केलं होतं.
त्यानंतर आता जेलभरो आंदोलनाची घोषणा बावनकुळेंनी केली आहे.