Friday, March 31, 2023
Advertisement
HomeMaharashtraपांढुरंगाचे द्वार झाले पुन्हा बंद ?

पांढुरंगाचे द्वार झाले पुन्हा बंद ?

- Advertisement -

राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे.

शेगावबरोबरच पंढरपूर देवस्थानाचा मंदिर आज आणि उद्या असे 48 तास बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. गेल्या 24 तासांमध्ये देशात 14 हजार रुग्ण सापडले असून त्यापैकी 7 हजारांहून अधिक रुग्ण हे एकट्या महाराष्ट्रातील आहेत.

या पार्श्वभूमीवर राज्यात बंदोबस्त कडक केला आहे. राज्यातील अनेक मंदिरंदेखील बंद करण्यात येत आहेत.

पंढरपूरचे मंदिर आज आणि उद्या असे 48 तास बंद असल्याची माहिती समोर आली आहे.

माघी यात्रेपुर्वीच वारकऱ्यांनी पंढरपुरातील मठामध्ये मुक्काम केला होता.

मात्र पोलीस प्रशासाने मठात वारकऱ्यांना मुक्काम करू दिल्यास मठाधिपतींवर गुन्हा दाखल करणार असल्याची नोटीस पाठविल्या आहेत.

पोलिसांनी मठांची तपासणी करताच 34 ते 40 हजार भाविक आपल्या गावी यात्रेपुर्वीच परतले आहेत.

यामुळे माघी यात्रेपुर्वीच पंढरपूर रिकामे होताना दिसत आहे.

पंढरपूर शहर व तालुक्यातील मठांची तपासणी करण्यासाठी उप विभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी चार पथके तयार केली आहेत.

या पथकांनी शनिवारी व रविवारी 257 मठांची तपासणी केली आहे.

यामध्ये शहरातील 137 मठ तर ग्रामीण भागातील 120 मठांची तपासणी केली आहे.

या तपासणी दरम्यान शनिवारी मठामध्ये भाविकांची संख्या होती.

मात्र रविवारी मठांची तपासणी केल्यानंतर मठातील उतरलेल्या भाविकांची संख्या कमी झाली असल्याचे दिसून आले आहे.

त्याचबरोबर मठामध्ये अचानक भेट देण्याचे काम पोलिसांकडून केले जात आहेत.

यामुळे मठातील भाविक आपल्या गावाकडे परतण्यावर भर देत आहेत.

पंढरपूर हद्दीवर कडक नाकाबंदी करण्यात आली आहे.

पंढरपूरात येणाऱ्या वाहनधारकांचे नाव , मोबाइल नंबर घेऊन पुढे सोडले जात आहे. तसेच मास्कची देखील तपासणी केली जात आहे.

भाविकांनी शहरात प्रवेश करू नये, मुक्काम करू नये व सद्यस्थिती मध्ये पंढरपुरात दाखल झालेल्या भाविकांना व नागरिकांना पोलीस प्रशासनाकडून मास्क वाटप केले जात असून यासाठी त्यांचे प्रबोधन देखील केले जात आहे.

माघ यात्रेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी 257 मठांची तपासणी केली आहे.

तर तालुक्यात 28 ठिकाणी तर शहरात 8 ठिकाणी नाकाबंदी केल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक विक्रम कदम यांनी दिली.

- Advertisement -
- Advertisement -

Stay Connected

16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe

Must Read

- Advertisement -spot_img

Related News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here