Tuesday, November 29, 2022
Home Maharashtra उकळत्या तेलात हात घालून चारित्र्याची परीक्षा ?

उकळत्या तेलात हात घालून चारित्र्याची परीक्षा ?

- Advertisement -

उकळत्या तेलात हात घालून नाणे बाहेर काढण्याची चारित्र्याची जीवघेणी परीक्षा घेण्याचा अघोरी प्रकार उस्मानाबाद जिल्ह्यात परंडा तालुक्यात समोर आला आहे.

पारधी समाजातील या दुर्दैवी महिलेची चित्रफीत सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. 

विशेष म्हणजे परंडा येथे ११ फेब्रुवारी राेजी घराबाहेर पडलेल्या या महिलेवर एका पोलिसासह दोन जणांनी अत्याचार केल्याची धक्कादायक माहितीही समोर आली आहे.

चार दिवसानंतर तिला घरी सोडल्याने पतीने तिच्या पावित्र्याची परीक्षा घेतली. दरम्यान, विधान परिषदेच्या उपसभापती

डॉ. नीलम गोऱ्हे यांनी याची गंभीर दखल घेतली असून दोषींविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी गृहमंत्र्यांकडे केली आहे.

स्थानिक पोलिसांनी बातमीची गंभीर दखल घेत कारवाई केली.

महिलेचा आणि आरोपींचा शोध घेण्यासाठी दोन पथख नेमले. परंतु, महिला आणि पुरुष दोघेही गायब आहेत.

त्यांना शोधून काढल्यानंतरच संपूर्ण प्रकरण समोर येईल. 

ही घटना जेवढी भयानक आणि अस्वस्थ करणारी आहे तेवढेच भयानक व दाहक वास्तव या घटनेच्या मुळाशी आहे. 

ही घटना आहे उस्मानाबाद जिल्ह्यातील परंड्यातील एका झोपडपट्टीमधील. १६ फेब्रुवारी ती घडली.

त्या महिलेचा नवरा, भाड्याच्या चारचाकी गाडीवर चालक म्हणून तो काम करतो.

त्याचे नाव अप्पाशा व त्याची बायको कुशा (बदललेली नावे )माहेरी जाण्यावरून ११ फेब्रुवारीला नवरा-बायकोमध्ये किरकीर झाली.

त्यानंतर कुशा उस्मानाबादमधल्या आपल्या आई-वडिलांकडे ११ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी निघाली.

परंड्यातल्या खासापुरी चौकात उभी असताना मोटार सायकल वरून जाणाऱ्या एकाने तिला जबरदस्तीने घेऊन गेला.

त्याने तिला उसाच्या रानात नेले. त्याने व परंडा पोलिसमधील एका पोलिसाने तिच्यावर दुष्कर्म केले.

चार रात्री, चार दिवस हा प्रकार चालू होता. दरम्यान, तिचा नवरा अप्पाशा हा तिला सगळीकडे शोधत फिरत होता.

उस्मानाबादमधील सिव्हिल हॉस्पिटल, बायकोच्या माहेरी आदी ठिकाणी तिचा शोध घेतला.

१५ फेब्रुवारी रोजी कुशाला सोडून देण्यात आले. कुणाकडे याची वाच्यता केली तर तुम्हा दोघा नवरा-बायकोला पेट्रोलने जाळून टाकू, असा दमही त्यांनी दिला.

पत्नी घरी आल्यानंतर अप्पाशा तिला सतत विचारत होता- एवढे दिवस तू कुठं होतीस? हे तो खोदून-खोदून विचारत होता.

त्या दोघांनी तुझ्याबरोबर काय केले? असे तो विचारत होता.

पण दोघा जणांनी केलेल्या दमबाजीमुळे कुशा नवऱ्याला काही सांगत नव्हती.

काहीच केले नाही, असे म्हणत होती.

तेव्हा खरे काय आणि खोटे काय हे तिच्याकडून वदवून घेण्यासाठी १६ फेब्रुवारी रोजी अप्पाशाने उकळत्या तेलातून नाणे काढण्याचा अघोरी प्रकार केला.

स्वत:चा व नवऱ्याचा जीव वाचावा म्हणून कुशा खरे काही सांगत नव्हती.तिने खरे बोलावे म्हणून तो प्रयत्न करत होता.

- Advertisement -
- Advertisement -

Stay Connected

16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe

Must Read

- Advertisement -

Related News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here