कलिंगड कापल्याशिवाय ते गोड आहे की नाही हे कसे समजू शकेल?
कलिंगड न कापता गोड आहे की नाही हे ओळखण्याच्या काही पद्धती आहेत त्या खालीलप्रमाणे
१.कलींगडावरील डाग
काही कलिंगडवर पांढरे डाग असतात,काहींवर पिवळे तर काहींवर केशरी – पिवळे.
हे डाग म्हणजे ज्यावेळी कलिंगड काढून ठेवले जातात ते या डागांच्या ठिकाणी खाली ठेवले जातात.

पांढरा डाग असलेला कलिंगड कधीही घेऊ नये.
शक्यतो पिवळसर किंवा केशरी पिवळसर डाग असलेला कलिंगड घ्यावा.खूप गोड असतो.
२.कलिंगडावरील जाळी
ही जाळी म्हणजे पोलीनेशन प्रक्रिये वेळी माशांनी जास्तीत जास्त वेळा फुलांना स्पर्श केला आहे.
जास्त जाळी म्हणजे गोड कलिंगड.
३.मुलगा की मुलगी
आ…..ही काय भानगड आहे.पण यावरही कलिंगड किती गोड आहे की त्यात पाण्याचा अंश जास्त आहे हे समजते.
उंच कलिंगड म्हणजे “मुलगा” यात पाण्याचा अंश जास्त असतो.गोल कलिंगड म्हणजे “मुलगी” हे खूप गोड असत.

४.आकार
कलिंगडाचा आकार जास्त मोठा नको किंवा जास्त छोटा ही नको.मधल्या आकाराचा कलिंगड गोड लागतो.
५.देठ
देठ जर हिरवा असेल तर कलिंगड लवकर काढल हे जास्त गोड नसत.देठ जर सुकलेला असेल तर गोड कलिंगड.
असे कलिंगड निवडा आणि या उन्हाळ्यात आस्वाद घ्या.
ठंडा ठंडा कूल कूल