नार्को टेस्ट :
आरोपीकडून खरी माहिती मिळवण्यासाठी नार्को टेस्ट केली जाते.
या टेस्टला ‘ट्रुथ सीरम’ असंही म्हटलं जातं. या टेस्टदरम्यान संबंधित आरोपीला सोडियम पेंटाथॉलसारखं औषध दिलं जातं.
पॉलिग्राफ तसंच नार्को टेस्ट काटेकोरपणे घ्याव्या लागतात.
“हे औषध दिल्यानंतर आरोपी पूर्णत: बेशुद्ध होत नाही आणि पूर्णत: शुद्धीतही नसतो.
या स्थितीला ट्रान्स कंडीशन म्हणतात. त्यानंतर क्रमाक्रमानं प्रश्न विचारून माहिती काढली जाते.”
नार्को टेस्ट मानसोपचार तज्ज्ञ किंवा अशा चाचण्या करण्यातील तज्ज्ञाच्या देखरेखीतच होते.
सरकारी हॉस्पिटलमध्ये किंवा सरकारी हॉस्पिटलमध्ये व्यवस्था नसेल तर वैद्यकीय महाविद्यालयात खासगी डॉक्टर बोलावून नार्को टेस्ट केली जाते.

हे डॉक्टर मानसोपचार क्षेत्रातले असतात आणि त्यांना नार्को टेस्टच्या प्रक्रियेची पूर्ण माहिती असणे अनिवार्य असते.
“यात सर्वाधिक सहभाग डॉक्टरचा असतो. कारण पुढे जेव्हा कोर्टात ते मांडलं जातं,
तेव्हा आरोपी किंवा पोलिस यांच्यापेक्षा डॉक्टरच्या म्हणण्याकडे कोर्ट अधिक लक्ष देतं.”
नार्को टेस्ट मध्ये सत्य बाहेर येतं.
_ तपासाला योग्य दिशा मिळण्यासाठी किंवा तपासात काही धागेदोरे मिळण्यासाठी अशा टेस्टचा वापर करतात. _