Saturday, June 3, 2023
Advertisement
HomeWorld"सुरीनाम" हा देश कुठे आहे ?

“सुरीनाम” हा देश कुठे आहे ?

- Advertisement -

“सुरीनाम” हा देश कुठे आहे, हे अनेक नाग़रिकांना माहिती नसेल, पण तिथे घडलेल्या सत्तांतरानंतर ह्या देशाबद्दल जाणून घेणं खरंच खूप रसस्पद (इंटरेस्टिंग) आहे!

“सुरीनाम” हा देश दक्षिण अमेरिका खंडाच्या पूर्व किनारपट्टीवर, ब्राझील देशाच्या अगदी डोक्यावर आहे!

इथे पूर्वी डचांची वसाहत होती! इंग्रज आणि डच यांच्यात झालेल्या करारानुसार शेकडो भारतीयांना इंग्रजांनी सुरीनामला कामगार म्हणून पाठवले! त्यांची गरज संपल्यावर त्यांना २ पर्याय दिले गेले :

१. स्वखर्चावर मायदेशी परतणे;

२. मोबदला म्हणून जमीन/थोडे पैसे स्विकारुन सुरीनाम मध्येच स्थायिक होणे!

बहुतांश मजुरांनी दुसरा पर्याय निवडला, आणि ते कायमचेच सुरीनामीज झाले!

आज तिथे एकूण लोकसंख्येच्या जवळपास ३०% लोक भारतीय वंशाचे आहेत, आणि हिंदुस्तानी ही प्रचलित भाषा आहे!

नुकत्याच आलेल्या निवडणूक निकालानंतर चंद्रीकाप्रसाद संतोखी यांनी सुरीनामचे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली!


भारतात अजून पर्यंत फक्त “रिपब्लिक” चॅनलने ह्या घटनेची दखल घेतली आहे!

सांतोखी यांनी “वेद” ग्रंथांवर हात ठेवून, संस्कृत मध्ये शपथ घेतली!

हे खरंच रसस्पद interesting, किंवा विरोधाभासी आहे! कारण,

सुरीनाम मधील ह्या ऐतिहासिक घटनेच्या काही महिने अगोदर म्हणजे देशव्यापी ताळेबंदी Lockdown घोषित होण्याच्या एक आठवडा आधी,

भारतीय संसदेच्या वरच्या गृहात काँग्रेस, MDMK आणि इतर विरोधी पक्षांनी संस्कृत भाषेला “dead language” म्हणत केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालयला तीव्र विरोध केला होता!

पहिली केंद्रीय संसकृत विश्वविद्यालयाची स्थापना करण्यासाठी, सरकारने २०१९ मध्ये एक विधेयक आणले होते!

त्यावरील चर्चेत काँग्रेसने संस्कृत भाषेला “dead” घोषित केलं!

भारताच्या समृद्ध वारशाची जाण भारताला इतर राष्ट्रांनी करुन द्यावी लागते, हेच भारतीयांचे (वैचारिक & इतर दृष्ट्या) दारिद्र्य आहे!

बाकी, सुरीनाम मध्ये खनिज संपत्ती “मुबलक” आहे, आणि ह्या क्षेत्रात भारतातून गुंतवणूक यावी,

अशी तेथील सरकारची इच्छा आहे! आपल्याला आर्थिक संधी economic opportunities आहेत, हे ह्यातून वेगळं सांगायलाच नको!

- Advertisement -
- Advertisement -

Stay Connected

16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe

Must Read

- Advertisement -spot_img

Related News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here