घाम आणि चिकटपणामुळे उन्हाळ्यात दर दोन दिवसांनंतर शॅम्पू करण्याची गरज भासते.
शॅम्पूचा उपयोग न केल्यास केस चिकट होतात तसंच केसांना दुर्गंध सुद्धा येऊ लागतो.
पण अति प्रमाणात शॅम्पूचा वापर केल्यास केसांवरील नैसर्गिक चमक देखील नाहीशी होऊ लागते.
केसांवरील नैसर्गिक चमक पुन्हा मिळवण्यासाठी आपण घरच्या घरी देखील हेअर कंडिशनर (Homemade Hair Conditioner) तयार करू शकता.
उन्हाळ्यामध्ये केसांची देखभाल करण्यासाठी हे कंडिशनर उपयुक्त व प्रभावी आहे.
उन्हाळ्यात अति प्रमाणात शॅम्पूचा उपयोग होत असल्याने अनेकजण कोरड्या व निर्जीव केसांच्या समस्येमुळे त्रस्त होतात.
यासह केसांवरील नैसर्गिक चमक देखील नाहीशी होऊ लागते. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी नैसर्गिक उपचारांची मदत घेऊन पाहा.

आपण देखील बाजारात मिळणाऱ्या केमिकलयुक्त हेअर कंडिशनरचा उपयोग करत आहात का? तर मग वेळीच व्हा सावध!
कारण अशा प्रोडक्टमुळे केसांना लाभ कमी मिळतात आणि नुकसानच अधिक होते. या लेखाद्वारे आपण होममेड हेअर कंडिशनर तयार करण्याची सोपी पद्धत जाणून घेणार आहोत.
हे कंडिशनर (Summer Hair Care Tips) केसांच्या आरोग्यासाठी अतिशय लाभदायक आहे.
महत्त्वाचे म्हणजे यात नैसर्गिक सामग्रींचा समावेश असल्याने केसांवर दुष्परिणाम होत नाहीत.