Friday, March 31, 2023
Advertisement
HomeLifestyleHealthरोजच्या आहारात काळ्या मीठाचा वापर ठरेल अत्यंत उपयुक्त.

रोजच्या आहारात काळ्या मीठाचा वापर ठरेल अत्यंत उपयुक्त.

- Advertisement -

आपल्या रोजच्या आहारात अनेक पदार्थ आपण वापरतो. जे नकळतपणे अन्नपदार्थांतून आपल्या पोटात जातात आणि आपली पाचनशक्ती उत्तम ठेवतात.

आयुर्वेदात अशा अनेक पदार्थांचं वर्णन करण्यात आलं आहे. त्यापैकीच एक आहे पादेलोण किंवा काळं मीठ .

या मीठाला हिमालयन सॉल्टही म्हटलं जातं.

हे मीठ मुख्यत:भारत, पाकिस्तान, नेपाळ, बांगलादेशात पसरलेल्या हिमालयाच्या पर्वतरांगांमध्ये मिळतं.

आयुर्वेदात  काळं मीठ शेकडो वर्षांपासून वापरलं जातं.

या मीठात मोठ्या प्रमाणात खनिजं असतात, जी विरघळत नसल्यामुळे रक्तात मिसळत नाहीत. तुम्ही रोजच्या जेवणात हे मीठ घालू शकता.

वेबएमडीच्या म्हणण्यानुसार हे काळं मीठ ज्या खडकापासून तयार होतं तो ज्वालामुखीशी संबंधित असल्यामुळे त्यात सल्फरचं प्रमाण खूप असतं. त्यामुळेच त्या मिठाला उग्र दर्प येतो.

या मीठात लोह आणि पोटॅशियम क्लोराइड मोठ्या प्रमाणात असतं, जे तब्येतीसाठी  उत्कृष्ट असतं.

अनेक पोषक तत्त्व:

आपण रोज वापरत असलेल्या पांढऱ्या मीठाच्या तुलनेत काळ्या मीठात सोडियमचं प्रमाण कमी आहे आणि हे मीठ अँटिऑक्सिडंट आहे. त्याचबरोबर लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम यासारखी खनिजं मोठ्या प्रमाणात असातात.

त्यामुळे या मीठाचं सेवन फायद्याचं ठरतं.

हृदयाची जळजळ करतं कमी

काळ्या मीठामुळे यकृतातील पित्ताची निर्मिती नियंत्रित करता येते. त्यामुळे हृदयाची जळजळ आणि रक्ताच्या गाठी होणं हे कमी होतं.

शरीरात आम्ल तयार होण्यास काळं मीठ रोखतं आणि आम्लाचा शरीरावर होणारा परिणामही कमी करतं.

तसंच जर तुम्हाला पोटात गॅस होण्याची तक्रार असेल तर एक चिमुटभर काळं मीठ तोंडात टाका लगेच आराम मिळेल.

हे मीठ छोट्या आतड्यांत व्हिटॅमिन शोषण्याचं प्रमाण वाढवायला मदत करतं त्यामुळे पचनसंस्था सुधारते.

black – salt

हृदयासाठी हितकारी

काळं मीठ शरीरातील कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी करण्यात मदत करतं.

नैसर्गिक रक्त पातळ करणारा घटक म्हणून काळं मीठ काम करतं. तसंच रक्तदाबालाही नियंत्रणात ठेवतं.

पण डॉक्टरांचं म्हणणं आहे की 6 ग्रॅमपेक्षा अधिक प्रमाणात काळं मीठ खाल्लं तर रक्तदाब वाढू शकतो.

जर दररोज थोडं काळं मीठ खाल्लं तर रक्तदाब नियंत्रणात राहू शकतो. शरीरातील ब्लड ग्लुकोज कमी झालं असेल तर काळं मीठ फायदेशीर आहे.

या मीठाचे अनेक फायदे आहेत त्यामुळे दैनंदिन जेवणात त्याचा समावेश केला तर ते आणखी चांगलं पण कुठलीही गोष्ट अति करणं कधीही वाईटच.

- Advertisement -
- Advertisement -

Stay Connected

16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe

Must Read

- Advertisement -spot_img

Related News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here