Saturday, June 3, 2023
Advertisement
HomeMaharashtraइंदोरीकर महाराजांच्या वक्तव्याने नवा वाद

इंदोरीकर महाराजांच्या वक्तव्याने नवा वाद

- Advertisement -

जगभरात तसेच देशाभरात नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी म्हणून विविध शासन प्रशासन प्रयत्नांची पराकष्ठा करत आहेत. पण महाराष्ट्रा मध्ये मात्र कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी लसीकरणाविरोधात वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. कोरोनाची लस घेतली पण नाही आणि घेणारही नाही, असं ते म्हणाले आहेत.

निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्या वक्तव्याने आता नवा वाद रंगण्याची चिन्हे आहेत.

निवृत्ती महाराज इंदोरीकर नेहमीच आपल्या नवनव्या वक्तव्यांनी चर्चेच्या केंद्रस्थानी असतात. त्यांच्या मागचा वादाचा फेरा संपत संपत नाही. अगदी मागील काही काळापूर्वी मुलगा आणि मुलीच्या जन्मावरुन त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. हा वादाचं भोवरा शांत होत नाही तोपर्यंत इंदोरीकर महाराजांनी पुन्हा एक वादग्रस्त वक्तव्य केले आहेत . नाशिक जिल्ह्यातील एका कीर्तनाच्या सोहळ्यादरम्यान ‘कोरोनाची लस घेतली पण नाही आणि घेणारही नाही’, असं ते म्हणाले.

घस घेतलीही नाही आणि घेणारही नाही

“कोरोना काळात शिक्षित लोकांनी चुकीचं वर्तन केलं. आपल्याच घरातील प्रिय व्यक्तींना, जवळच्या व्यक्तींना अतिशय चुकीच्या पद्धतीने वागवलं. त्यांना चांगल्या ताटात जेवणं दिलं नाही. त्यांच्या अंथरायच्या पांघरायच्या गोधड्या जाळल्या. त्यांच्या हाताला स्पर्श होणार नाही, इतकं फटकून त्यांच्याशी वागले. इथं हात लावू नको, तिथं हात लावू नका.. अशी सगळी कोरोना काळात परिस्थिती होती. पण मी लस घेतली नाही आणि घेणारही नाही. काही होतंच नाही तर लस कशाला घ्यायची”, असं इंदोरीकर महाराज म्हणाले.

मन खंबीर ठेवणं हाच कोरोनावर उपाय

कोरोना आणि लसीविषयी अधिक स्पष्टीकरण देताना ते उपस्थितांना म्हणतात, “कोरोना काळात अनेकांचं निधन झालं, ज्यातली निम्मी माणसं हे टेन्शनने गेली. प्रत्येकाची इम्युनिटी पॉवर ही वेगवेगळी आहे. प्रत्येकालाच कोरोना होत नसतो. कोरोनावर मन खंबीर ठेवणं हाच उपाय आहे”, असं ते म्हणाले.

इंदोरीकर महाराजांविरोधात गुन्हा दाखल झाला पाहिजे

इंदोरीकर महाराज यांच्या वक्तव्याने आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ, दिग्गज डॉक्टर, लसीकरणासाठी झटणाऱ्या स्वयंसेवी संस्था यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. समाजमाध्यमांवरुन तर इंदोरीकर महाराज यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.

- Advertisement -
- Advertisement -

Stay Connected

16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe

Must Read

- Advertisement -spot_img

Related News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here